" कलयुगीन माणुस " कलीयुगात कसला हा अंधार , करावा कसा माणसाने उध्दार , संज्जन सांगतात समाजात सदाचार , घातला यांनीच भ्रष्टाचार ... ।।१।। गोरगरीब झालेत लाचार , संतांचे उपदेश होऊनी बेजार , कसला मांडला हा संसार , सत्याच्या तलवारीला बोथट धार ... ।।२।। करू सर्वजण ऐक्याचा कारभार , त्यातही आहे जातीचा घातक विचार , अशाने काय देश चालणार ?? सांगा आता देशाला कोणाचा आधार .. ??।।३।। चालले जागोजागी अत्याचार , दिनदुबळे रस्त्यावर भिक मागणार , अशाने काय माणुसकीचे भले होणार ?? मग कोण कोणासाठी धावणार ??।।४।। उठा माणसांनो घडवू चमत्कार , वाईट घडामोडींना करू बेजार , पसरवूनी सृष्टीत सद्विचार , करू माणूसकीला नमस्कार ... ।।५।। - " रविकल्प "
अशाच सुंदर सुंदर मराठी कविता आणि अशा वैविध्यपूर्ण लेखांचे अपडेट्स मिळविण्यासाठी आमचे पेज हितगुज मनाशी ला नक्की लाईक, फॉलो आणि शेअर नक्की क...
Marathi Jokes | मराठी विनोद, भन्नाट मराठी जोक्स मराठी जोक्स म्हणजे मराठी भाषेत सांगितले जाणारे विनोद. निराशा हा असा आजार आहे की एकदा कुणालाही त्याचा फटका बसला